Pune : ...त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये पॅकिंग केलेले वडापाव इथून पुढे मिळणार नाहीत SaamTV
मुंबई/पुणे

Pune : ...त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये पॅकिंग केलेले वडापाव इथून पुढे मिळणार नाहीत

वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्त पत्र छपाईसाठी करतात.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : पुण्यामध्ये (Pune) आता काही खायच असल्यास किंवा ते पॅकिंग करुन घरी न्यायच असल्यास ते शक्य़ नाही. कारण आता खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी कोणत्याही वर्तमानपत्राचा वापर करता येणार नाही असा आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने काढले आहेत.

वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारा पेररवरती प्रिंट करण्यासाठी वापरली जाणाऱ्या शाईमध्ये घातक केमिकल (Chemical) असतात आणि गरम खाद्यपदार्थ (Food) त्या पेपरवरती ठेवल्यास ते केमिकल विरघळते आणि त्यामध्ये ठेवलेले पदार्थ आपण खाल्याने आपल्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो कारण केमिकल चिकटलेले खाद्यपदार्थ आरोग्यास घातक असल्याच निष्पन झाल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) म्हंटल आहे.

हे देखील पहा -

अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव, (Vadapav) पोहे या सारखे अन्न पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्त पत्र छपाईसाठी करतात. अशा न्युजपेपरमध्ये (News Paper) गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वर्तमानपत्राचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट; दोन दिवसांच्या पावसामुळे चांदसैली घाटात कोसळली दरड

Tandulwadi Fort History: हिरवागार निसर्ग अन् ट्रेकिंगसाठी खास! तांदुळवाडी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update : संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

'लग्नाच्या १० महिन्यांत १० दिवसही खूश नाही, मी आयुष्य..' VIDEO तयार करून विवाहितेनं आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल

Skin care : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तज्ज्ञांच्या या सवयी ठरतील उपयोगी

SCROLL FOR NEXT