बोरवलीमध्ये झळकल्या 'No Kissing Zone'च्या पाट्या; पाहा VIDEO सुरज सावंत
मुंबई/पुणे

बोरवलीमध्ये झळकल्या 'No Kissing Zone'च्या पाट्या; पाहा VIDEO

सुरज सावंत

मुंबई: तुम्ही आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील. सायलेंट झोन च्या पाट्या वाचल्या असतील. तसंच नो पार्किंग (No Parking Board) च्या सुद्धा पाट्या वाचल्या असतील. मात्र मुंबईच्या बोरवली (Mumbai Borivali) परिसरात आशा पाट्या लागले आहेत. ज्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. हा बोरवली चा जॉगर्स पार्क आहे. इथं लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात.

मात्र इथं जे लिहिले आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथे लिहलंय नो किसिंग झोन (No Kissing Zone). या जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात. त्यांचे अश्लील चाळे पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांंनी चक्क रस्त्यावर 'नो किसिंग झोन' लिहिले आहे.

संबंधीत जागा बोरवली मधील हाय प्रोफाइल इलाका आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवलं आहे. या गार्डन मध्ये रोज कपल्स येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहात असतात.आणि अश्लील चाळे करत असतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती रोज हे पाहून त्रस्त झाले होते.

वाढणारे हे प्रकार लक्षात घेता सोसायटीतल्या लोकांनी एक नामी शक्कल लढवली. या अश्लील चाळे करणाऱ्या कपल्स ला वेसण घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावर लिहिलं की, नो किसिंग झोन. हा मेसेज लिहिल्यानंतर या भागामध्ये कप्पल्स कमी झालं आहे. आणि जे अश्लील कृत्य चालायची ती बंद झाली आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT