Ambernath News Saam Tv
मुंबई/पुणे

रासायनिक टँकर्सचा 'रात्रीस खेळ' होणार बंद! एमआयडीसी परिसरात नो एंट्री

संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत प्रवेश नाही; ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे आदेश

अजय दुधाणे

अंबरनाथसह डोंबिवली आणि बदलापूर एमआयडीसीत यापुढे रासायनिक टँकर्सना नो एंट्री असणार आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत ही प्रवेशबंदी असणार आहे. ठाणे पोलिसांच्या (Thane Police) विशेष शाखेनं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळं या टँकर्सचा रात्रीस खेळ थांबणार आहे. एकीकडे नद्यांची स्वच्छता केली जात असतानाच नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये रात्रीच्या वेळी रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार मागील काही दिवसात आढळून आले आहेत.

हे देखील पाहा -

त्यामुळं यापुढे एमआयडीसी विभागात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत रासायनिक टँकर्सना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळं या टँकर्सच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारात केल्या जाणाऱ्या कृष्णकृत्यांना चाप लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने असून बहुतांशी कारखाने हे त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदी किंवा नाल्यात सोडतात. तर काही कारखाने हे सांडपाणी टँकरमध्ये भरून दूरच्या एखाद्या नाल्यात सोडण्यास सांगतात. त्यातच अंबरनाथ एमआयडीसीत सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुद्धा बंद असल्यानं हे प्रकार मागील काही दिवसात चांगलेच वाढले होते. त्यामुळं आता पोलिसांच्या या आदेशानंतर जलस्रोतांमध्ये केलं जाणारं रासायनिक प्रदूषण थांबेल, अशी आशा आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT