Nitesh Rane
Nitesh Rane Saam TV
मुंबई/पुणे

...आता 'फटके' यात्रा काढण्याची वेळ आली आहे; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

पुणे : राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. आज पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. मात्र, या वाहनावर हल्ला करणारे कोण होते, हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही. मात्र, तर उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. (Uday Samant Attack News)

हे देखील पाहा -

meow meow बंद होईल

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नितेश राणेंनी ट्विट केलं की, "निष्ठा यात्रा च्या बरोबर.. “फटके” यात्रा काढण्याची वेळ आली आहे.. meow meow बंद होईल!! हीच ती वेळ!!!" अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे. आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढतायत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या गाड्या फोडा आणि जिल्हाप्रमुख पदासह उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर सन्मान स्वीकारा, असे चिथावणीखोर आवाहन शिवसेनेचे हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केला होता. यानंतर उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने हा हल्ला शिवसैनिकांनीच केला असल्याचा संशय बंडखोर आमदारांनी व्यक्त केला आहे.

हल्ला कसा आणि कुठे झाला?

पुण्यातील कात्रजमध्ये उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच फुटली आहे. उदय सामंत यांनी या हल्ल्याची तक्रार कोथरूड पोलीस स्थानकात केली आहे. वाहनावर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी साम टिव्हीशी संवाद साधला. त्यावेळी उदय सामंत म्हणाले, ' माझा ताफा कोणी अडवला नव्हता. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला गाडी थांबल्यानंतर काही तरुण बेसबॉलची स्टीक आणि हातात दगड घेऊन आले.'

हल्लेखोरांनी माझ्या वाहनावर हात मारायला सुरुवात केली. मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी वाहनाच्या मागच्या बाजूने वाहनाची काच फोडली. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहन घेऊन मी तिथून पळालो. हल्लेखोरांचा हेतू वाईट होता. त्यांना कोणी पाठवलं असं वाटत नाही. त्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे. अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे. या हल्ल्यानं मी घाबरणार नाही. राज्यात कशी गुंडाशाही आहे, हे राज्यात सांगणार आहे, असे ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shriniwas Pawar News : तर अजित पवारांनी आताच मिशी काढावी, बंधू श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

SCROLL FOR NEXT