Dawood Ibrahim and Nawab Malik
Dawood Ibrahim and Nawab Malik Saam Tv
मुंबई/पुणे

मलिक प्रकरणावरून राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल; “आता स्वत: दाऊदनं फोन करून…”

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मनी लॉंडरिंग प्रकरणावरून कारवाई झाली आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) असल्याचा आरोप करण्यात झाला यावरून विरोधीपक्ष भाजपने (BJP) मलिक यांच्याविरोधात टीका करण्यास सुरुवात केली. मलिकांवर ईडीने (ED) कारवाई करत अटक केल्याने मलिक आता ईडी कोठडीत आहेत. यासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज टीका केली त्यांच्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि या प्रकरणावरून मलिकांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी मलिक यांनी आपल्या याचिकेत केली होती. मात्र, आज न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. “याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत”, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, मलिक यांनी केलेली सुटकेची मागणी देखील न्यायालयाने फेटाळली आहे.

निलेश राणेंचे ट्विट;

यावर, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करून खोचक टोला लगावला आहे. “मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता काय स्वत: दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादीवाल्यांना की त्यांचा राजीनामा घ्या?” असा सवाल निलेश राणेंनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकरावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, “कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यांनतर आज उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडीची कारवाई ही योग्य आहे. माझा सवाल आहे की, बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदच्या माणसासाबोत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार आहे? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही, तर हे स्पष्ट आहे. की, हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करत आहे”, असे देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

Health Tips: लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही बनवू नका हे पदार्थ, नाहीतर...

SCROLL FOR NEXT