Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar Group Saam TV
मुंबई/पुणे

Political News : निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार?; विश्वसनीय सूत्रांची 'साम टीव्ही'ला माहिती

Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar Group : शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे | पुणे

Pune News :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात सामील होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश लंके यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून साम टीव्हीला मिळाली आहे.

शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. आज दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी निलेश लंके पक्षांतर करु शकतात. 'मी अनुभवलेला कोविड' पुस्तकाचे देखील आज प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक लंके यांनी लिहिलेले असून याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. (Latest Marathi News)

सुजय विखेंविरोधात निवडणूक लढवणार?

निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर ते निवडणूक लढवतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

भाजपकडून खासदार सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार निलेश लंके आता ॲक्शन मोडवर आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता दोघे निवडणुकीत एकमेकांसमोर येऊ शकतात.

काय म्हणाले होते निलेश लंके?

निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर निलेश लंके शरद पवार गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र निलेश लंके यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगून, या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही. मोठ्या साहेबांनी देखील यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. मी आता दादांसोबत आहे, असे निलेश लंके यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT