सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Ghaywal passport controversy latest update : पुण्यात कुख्यात गुंड घायवळ प्रकरणात दररोज नवीन आरोप अन् प्रत्यारोप होत आहेत. घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला? याचा तपास सध्या करण्यात येत आहे. याबाबत दररोज नवीन दावे केले जात आहेत. आता भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात उडी घेत खळबळजनक आरोप केलाय. शिरोळे यांनी जामखेडचे नाव घेत रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. गुंड निलेश गायवळ याला मविआच्या काळात पासपोर्ट मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी समोर येत असताना आज भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात उडी घेतली. निलेश घायवळ याला जो पासपोर्ट देण्यात आला, तो पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने दिला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हा पासपोर्ट माविआ तसरकार असताना देण्यात आला होता असाही आरोप त्यांनी केलाय.
घायवळ पासपोर्ट बाबत काही गोष्टी खुलासा केला जात आहे. परदेशात कोणी जातो, त्यावेळी हा पासपोर्ट देण्यात येतो. निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला? हा प्रश्न मला पडला आहे. घायवळ यांनी डिसेबर 2021 मध्ये पासपोर्ट साठी अर्ज केला होता. पोलीस व्हेरिफिकेशन 15 जानेवारी 2020 ला दिला. त्याचे गाव सोनेगाव जामखेड येथील रहिवासी आहे, असे शिरोळे म्हणाले.
ही सगळी प्रोसेस सुरू होती, त्यावेळी माविआ सरकार होते. पासपोर्ट देताना पोलिस पडताळणीमध्ये काही गोष्टी समोर आल्या, त्या सगळ्या संशयास्पद आहेत. यामध्ये घायवळ यांनी बनावट पत्ता दिलाय, यात कुठलेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असे सांगण्यात आले. हा पासपोर्ट रिपोर्ट दबावाखाली दिला गेला का? त्याला ज्यावेळी हे सगळे दिले, त्यावेळी कर्जत आमदार कोण होते? गृहमंत्री कोण होते? मुख्यमंत्री कोण होते? याची चौकशी मुख्यमंत्री यांनी करावी अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.