Mobile Theft D Gang Connection Saam TV
मुंबई/पुणे

Underworld: देशातील चोरीच्या मोबाईल्सचा डी कंपनीकडून दहशतवादासाठी वापर; गुप्तचर संस्थेचा मोठा खुलासा

Mobile Theft D Gang Connection: हे चोरीचे फोन प्रथम बांग्लादेशला पाठवले जातात, जिथे मोबाईलचा IMEI नंबर बदलला जातो.

सुरज सावंत

मुंबई: देशातील विविध भागातून चोरी गेलेल्या मोबाईल फोन्सचा (Mobile Theft) वापर हा दहशतवादासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood) याची गॅंग म्हणजेच डी कंपनीकडून चोरीच्या मोबाईल्सचा वापर दहशहतवादी कारवाया तसेच नेटवर्क तयार करण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक राष्ट्रीय माहीती केंद्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाली आहे. (Underworld News)

नुकत्याच झालेल्या इंटेलिजन्स शेअरिंग बैठकीत देशातील विविध गुप्तचर संस्था हजर होत्या. यावेळी मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की, ते डी-कंपनीचे म्हणजेच अंडरवर्ल्डचे नेटवर्क तोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून एनआयएसोबत काम करत आहेत. गुन्हे शाखेला तपासात असेही आढळून आले आहे की, देशभरातील चोरीला गेलेले स्मार्टफोन्स हे मुंबईतील डी कंपनीच्या टेक्नो तज्ज्ञांकडून तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांच्या IMEI नंबरची फेरफार केली जाते. या तपासात समोर आलेली आश्‍चर्यकारक बाब म्हणजे याच चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक वापरुन 40 ते 50 मोबाईल्स चालवले जात आहेत.

हे चोरीचे फोन प्रथम बांग्लादेशला पाठवले जातात, जिथे मोबाईलचा IMEI नंबर बदलला जातो. हे चोरीचे फोन बांग्लादेशातून पाकिस्तानात पोहोचवत असल्याचा संशय एजन्सींनी व्यक्त केला आहे. यानंतर डी कंपनी या मोबाईल्सचा एकतर वापर करते किंवा काळ्या बाजारात व्यवहार करते असंही तपासात उघड झालं आहे. आरोपींनी IMEI क्रमांक बदलण्यासाठी वापरलेले लॅपटॉप आणि तंत्रज्ञान शोधले जात असल्याचेही गुन्हे शाखेने या बैठकीत सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT