NIA Saam TV
मुंबई/पुणे

NIA attaches two floors of School: पुण्यात NIA ची मोठी कारवाई; प्रसिद्ध शाळेवर जप्तीची कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर

Pune News : ब्लू बेल शाळेच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला राष्ट्रीय तपास यंत्रणेने सील केला आहे.

Prachee kulkarni

Pune News : पुण्यातील एका शाळेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जप्तीचा कारवाई केली आहे. या शाळेच्या इमारतीचे दोन मजले जप्त केले आहेत. ब्लू बेल शाळेच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला राष्ट्रीय तपास यंत्रणेने सील केला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) कडून या इमारतीचा वापर होत असल्याच्या संशयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. या दोन्ही मजल्यांवर दहशतवादी कृत्य करणे, भरती प्रक्रिया करणे, दहशतवादी कृत्याचं प्रशिक्षण आणि टार्गेट किलिंगच प्रशिक्षण देण्यास वापर झाल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा आहे. (Latest Marathi News)

काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने याठिकाणी धाड टाकली होती. २२ सप्टेंबर रोजी येथे सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यावेळी याठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संबंधीचे कार्यालय असल्याचे आणि काही कागदपत्र सापडले होते. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हा कारवाईचा फास आवळला आहे.

PFIवर पाच वर्षांची बंदी

संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर दहशतवादी निधी आणि इतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांच्या एजन्सींनी पीएफआयच्या अनेक ठिकाणी छापे टाकून शेकडो सदस्यांना ताब्यात घेतले होते.

पीआयएफ ही संघटना जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे काम करते, असाही आरोप होत होता. एनआयएने पीएफआयवर शस्त्र प्रशिक्षण शिबिरे चालवल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर ही संघटना तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करते, असाही गंभीर आरोप होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT