मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर 14 मार्च रोजी मुंबईतील विशेष न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायधीश रोकडे हे सोमवारी 14 मार्चला 100 कोटी प्रकरणी देशमुखांच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावणार असल्याची माहिती आहे (Next Hearing On Anil Deshmukhs Bail Petition On 14th March).
जामिनावर आजही निर्णय नाही
100 कोटी वसुलीप्रकरणी (100 Crore Recovery Case) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्या जामिनावर आजही निर्णय आला नसल्यानं देशमुख (Anil Deshmukh) यांची तुरुंगवारी वाढली आहे. निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने मुंबई विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्या जामिनावर मुंबईतील विशेष कोर्टने निर्णय पुढे ढकलला असून निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने आज निर्णय देता येणार नाही असं न्यायाधीश रोकडे यांनी सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या 14 मार्चला होणार सआहे. तेव्हा याप्रकरणी निर्णय देण्यात येईल, असं न्यायधीश रोकडे यांनी सांगितलं.
अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात
100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं आहे. राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले होते. तसेच माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे या वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती असा आरोप अनिल देशमुखांवर आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.