विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

रद्द परीक्षेची पेपरात जाहिरात

विश्वभूषण लिमये

सोलापूर - आरोग्य विभागाची होणारी परीक्षा Heath Department Exam अचानक रद्द करण्यात आली आहे. ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh यांनी दिलेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र संतापाची लाट उसळून आली. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे. कारण एका वृत्तपत्रात (सकाळ नव्हे) रद्द परीक्षेची जाहिरात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या कार्यालयामार्फत ही जाहिरात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आणखी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान, न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.आज आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा करून आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख मंगळवारी मुंबईत बैठक झाल्या नंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Ice Facial Benefits : बर्फानं फक्त १० सकेंद करा मसाज, महिनाभरात चेहरा काचेसारखा चमकेल, आईस फेशिअलचे ७ फायदे पाहाच

Modern Mangalsutra Designs: लाडक्या बायकोसाठी खरेदी करा मॉडर्न मंगळसूत्र; ‘हे’ ५ डिझाईन्स पाहून ती नक्की होईल खूश!

विश्वासाने दिले १.२० कोटी, बॅग उघडताच कागदी पुड्या; राजस्थानात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT