पुणे - पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग Money Laundering प्रकरणात ईडीने ED बिल्डर अविनाश भोसले Avinash Bhosale आणि त्यांचा मुलगा अमित भोसले Amit Bhosale यांना नवीन समन्स बजावले आहे. गुरुवारी १ जुलै रोजी ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाला ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहायला सांगितले होते. New summons issued by ED to Avinash Bhosale and his son
माञ भोसले यांनी कोविडचे कारण सांगत ईडीला त्यांची अनुपलब्धता कळविली आहे. अविनाश भोसले यांनी पुण्यातिला निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारती बांधली असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
हे देखील पहा -
भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही यावेळी आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात पुण्यातील भोसले यांच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. शोध घेतल्यानंतर अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. New summons issued by ED to Avinash Bhosale and his son
गेल्याच महिन्यात ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (फेमा) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती. भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमा कायद्याचे उल्लंघन करत दुबईत मालमत्ता संपादन केल्याचे एजन्सीला आढळले होते.
भोसले हे महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांनी त्यांच्यावर ईडीने जारी केलेले समन्स टाळण्यासाठी सर्व देशभर कोविडची साथ असल्याचे नमूद केले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.