Sasoon Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Latest News : ललित पाटील प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली जारी

Sasoon Hospital News : ससून रुग्णालयात प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News :

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालया देखील चर्चेत आलं होतं. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे प्रशासनाने आता ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन अनेक पावले उचलणार आहे. ससून रुग्णालयात अनेक कैदी अनेक दिवसांपासून तिथे मुक्काम ठोकून असल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र आता ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे. (Maharashtra News)

ससून रुग्णालयात प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक महिन्याला कैद्यांचा बोर्ड समिती आढावा घेणार आहे. त्यामुळे ललित पाटील पलायन प्रकरणानंतर सावध झालेल्या रुग्णालय प्रशासनाच्या या उपाययोजनांचा किती फायदा होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Famous Actress Death: मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

CPR During Heart Attack: हार्ट अटॅक आला की सीपीआर कधी द्यायचा? जीव वाचवण्यासाठी योग्य मार्ग लक्षात ठेवा

Mosquito : घराच्या प्रत्येक कोपऱ्यात डास? ना कॉइल, ना स्प्रे! मच्छर-माशा पळवण्यासाठी वापरा 'हा' ९९% देसी उपाय

SCROLL FOR NEXT