सचिन जाधव, पुणे
Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांवर आधारीत पुस्तकाचं पुण्याच प्रकाशन होणार आहे. मात्र, प्रकाशनाआधीच हे पुस्तक वादात सापडलं आहे. 'लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड' या नावाचं पुस्तक १८ डिसेंबरला प्रकाशित होत आहे. अशात या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांचा विरोध होत आहे.
बॉम्बस्फोटातील आरोपीवरील पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडित वकील शाहिद नदीम यांनी केली आहे. सोबतच भीमआर्मी बहुजन एकता मिशनचे अध्यक्ष अंजुम इनामदार आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी याबाबत एसपी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहीलं आहे. (Pune Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर २०२२ ला सायंकाळी ४ वाजता पुण्यातील एसपी महाविद्यालयात या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. स्मिता मिश्रा लिखित 'लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित: द मैन बेट्रेयड?' या पुस्तकाचं (Lt. Col. Purohit: The Man Betrayed) नाव असून पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये तीन IPS अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यासाठी जयंत उमरानीकर, सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे हे अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाचं संचालन मेजर गौरव आर्य करणार आहेत. तर पुस्तकाचं प्रकाशन वितस्ता पब्लिशिंग रेणू कौल वर्मा यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
हे पुस्तक प्रकाशित होऊ नये अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast) प्रकरणातील पीडित वकील शाहिद नदीम यांनी केली आहे. याबाबत अश्या पद्धतीने पुस्तक प्रकाशन करून न्यायालयाचा अवमान असल्याचं शाहिद नदीम यांनी म्हटलंय. तर न्यायालयाचा कोणताही अवमान होणार नसल्याचा दाव लेखकाने केला आहे. सोबतच भीमआर्मी बहुजन एकता मिशनचे अध्यक्ष अंजुम इनामदार आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी एसपी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहीलं आहे. (Maharashtra News)
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधल्या भिकू चौकाजवळ एका दुचाकीचा स्फोट घडवून आणला गेला होता. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 92 जण जखमी झाले होते. तत्कालीन गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला होता. 23 ऑक्टोबर 2008 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, राकेश धावडे, राजा रहिकार आणि जगदीश म्हात्रे यांना आरोपी म्हणून कोर्टात हजर करण्यात आलं.
पण या स्फोटात लष्करी जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली. हा लष्करी जवान म्हणजेच कर्नल पुरोहित हे होय. पण लष्कराकडून कर्नल पुरोहित यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या पुस्तक प्रकाशनाचं पोस्टर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
मा. प्राचार्य एस.पी. कॉलेज,
पुणे, महाराष्ट्र.
विषय:- “लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड?
आदरणीय साहेब,
या पत्राद्वारे आम्ही आपणास विनंती करीत आहोत की, एसपी कॉलेज आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसमावेशक जनतेच्या हितासाठी आमच्या विनंतीचा विचार कराल.
“एलटी कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड?” असे शीर्षक असलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचे पोस्टर आमच्या समोर आले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम 18 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे नियोजित आहे. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर पोस्टर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जाते.
की, पोस्टरमध्ये असे दिसते की, पुस्तकाचा शुभारंभ कार्यक्रम महाविद्यालयाच्या आवारात, म्हणजे लेडी रमाबाई हॉलमध्ये होणार आहे. एसपी कॉलेज, टिळक रोड पुणे येथे आयोजित केला आहे.
आम्ही तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, कर्नल पुरोहित हे मालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत ज्यात 6 लोक मरण पावले आणि शंभरहून अधिक जखमी झाले. अत्यंत गंभीर प्रकाराचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. आणि इतर कायद्यांतर्गत गंभीर आरोप आहेत.
पुस्तक प्रकाशनामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणि त्याचा उज्ज्वल ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल. आम्ही पुढे असे सादर करू इच्छितो की, हे प्रकरण मुंबईतील NIA न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि एसपी कॉलेजमध्ये पुस्तक लाँच करणे अजिबात उचित नाही. ज्याचा शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही अशा उपक्रमांसाठी कोणालाही महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नका.
अशा परिस्थितीत, महाविद्यालयाच्या व्यापक हितासाठी पुस्तक प्रकाशनाची परवानगी त्वरित मागे घ्यावी. तरी दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी आपणास विनंती करण्यात येत आहे.
आपला विश्वासू
मा. दत्ता पोळ
अध्यक्ष भीमआर्मी बहुजन एकता मिशन
9518780857
मा. अंजुम इनामदार
अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच
9028402814
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.