Mumbai AC Local Train Fare: 'असे' असणार एसी लोकलचे नवे तिकिट दर
Mumbai AC Local Train Fare: 'असे' असणार एसी लोकलचे नवे तिकिट दर SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai AC Local Train Fare: 'असे' असणार एसी लोकलचे नवे तिकिट दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात उष्णतेची लाट वाढत असून मुंबईकर देखील उन्हाळ्यातील उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी एसी लोकलच्या गारेगार प्रवासाला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या खिश्याला न परवडणाऱ्या आता मुंबईकरांना मोठी खुशखबर रेल्वे विभागाने दिली आहे. आता एसी लोकलच्या तिकिटाचे दर ५० टक्क्यांनी कमी झाल्याने वाढलेल्या उकाड्यात मुंबईकर आता गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव घेऊ शकणार आहेत. नव्या तिकीट दरानुसार गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांना किती पैसे मोजावे लागणार हे जाणून घेऊया.

सीएसएमटी ते दादरसाठी एसी लोकलच्या तिकीट दर ६५ रुपये असून ५० टक्क्यांनी दरात कपात केल्याने ३० रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. सीएसएमटी ते ठाणे स्थानक आताचा तिकीट दर १८० असून आता ९० रुपये, सीएसएमटी ते कल्याण स्थानक आताचा तिकीट दर २१० रुपये असून ५० टक्के कपातीनुसार १०५ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. तसेच सीएसएमटी ते टिटवाळादरम्यान तिकीट दर २२० इतका आताचा असून नव्या दरानुसार ११० रुपये असेल तर सीएसएमटी ते अंबरनाथ स्थानकादरम्यान आताचा तिकीट दर २०५ रुपये असून नव्या दरानुसार १०० रुपये आकारले जातील.

त्याचप्रमाणे चर्चगेट ते बोरिवली आताचा तिकीट दर १८० रुपये इतका असून नव्या दरानुसार ९० रुपये तर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान २२० रुपये आताचा तिकीट दर असून ११० रुपये इतका कमी झालेला तिकीट दर असणार आहे. या एसी लोकलच्या नव्या तिकीट दाराची लवकरच अंमलबाजवणी केली जाईल. त्यानंतर मुंबईकरांना उन्हाच्या उकाड्यात गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव घेता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

Bhandara News: धक्कादायक! प्रसुतीनंतर डॉक्टर विसरले महिलेच्या पोटात कापड, तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील घटना

KL Rahul Statement: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Nashik Bank Robbery | ICICI होम फायन्सास कंपनीच्या शाखेत चोरी,लॉकरमधील 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

SCROLL FOR NEXT