गुड न्यूज! मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, एसी लोकलच्या दरात ५० टक्क्यांनी घट

Ac Local fare reduces : आता एसी लोकलच्या तिकिटाचे दर ५० टक्क्यांनी कमी (decrease) झाल्याने वाढलेल्या उकाड्यात मुंबईकर आता गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव घेऊ शकणार आहेत.
Local Train: हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान एसी लोकल उपनगरीय सेवा सुरू
Local Train: हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान एसी लोकल उपनगरीय सेवा सुरूSaam Tv
Published On

मुंबई - राज्यात उष्णतेची (summer) लाट वाढत असून मुंबईकर देखील उन्हाळ्यातील उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी (mumbaikar) एसी लोकलच्या गारेगार प्रवासाला पसंती दिली आहे. मात्र, गारेगार प्रवासासाठी सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजता येत नव्हते. पण आता मुंबईकरांना मोठी खुशखबर रेल्वे विभागाने दिली आहे. मुंबईकर रेल्वे प्रवाशांकडून (railway passenger) एसी लोकलचे दर (fare) कमी करावेत यासाठी मागणी होत होती. आता एसी लोकलच्या तिकिटाचे दर ५० टक्क्यांनी कमी (decrease) झाल्याने वाढलेल्या उकाड्यात मुंबईकर आता गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव घेऊ शकणार आहेत.

सर्वसाधारण मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा नसल्याने तिकीट दर कमी करावेत अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही लावून धरली होती. आता एसी लोकलचे दर ५० टक्क्यांनी कमी झाल्याने आता गारेगार प्रवास सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली आहे. याच कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Local Train: हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान एसी लोकल उपनगरीय सेवा सुरू
खुशखबर! एसी लोकलचे दर कमी होणार, प्रवासी संघटनांकडून केली होती मागणी

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल अत्याधुनिक करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली होती. मात्र, एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने प्रवाशांकडून वारंवार तक्रार केली जात होती. उन्हाळ्यात एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवासी या सेवेचा वापर करू शकत नव्हता. म्हणून एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती.

मध्य रेल्वेकडून ५ हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचं तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली होती. आता याच सर्व मागण्यांचा मागोवा घेत रेल्वे प्रशासनाकडून तिकटी ५० टक्क्यांनी कपात केल्याने मुंबईकरांना दिलासादायक बातमी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com