Metro 3 News Saam Tv News
मुंबई/पुणे

Metro 3 News: नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार खास गिफ्ट; मेट्रो ३ च्या ६ स्थानकांचं काम होणार पूर्ण, वाचा सविस्तर

Metro 3 to connectivity: येत्या मार्चपर्यंत सहा महत्त्वाच्या मुंबई मेट्रोच्या स्थानकांची कामं पूर्ण होणार आहे. तसेच बीकेसी ते कुलाबा जोडणारा पुढील भाग मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद होईल.

Bhagyashree Kamble

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद करणाऱ्या मेट्रो ३ च्या कामाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. मेट्रो ३ च्या मार्गातील वरळी ते आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतच काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या नव्या स्थानकांचं पूर्ण झाल्यानंतर धारावी आणि वरळी पट्ट्यात राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुढील टप्प्यात ६ महत्त्वाच्या स्थानकांचं काम पूर्ण होणार आहे. हा नवीन टप्पा धारावीपासून आचार्य अत्रे चौकापर्यंत असेल. यात सहा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. या सहा महत्त्वाच्या स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धीविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश असेल. येत्या मार्चपर्यंत या सहा स्थानकांची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मेट्रो ३ बाबत बोलताना, एमएमआरसीचे प्रकल्प संचालक एसके गुप्ता म्हणाले, आम्ही मार्च २०२५ पर्यंत हा ९.७ किमीचा भुयारी मेट्रोचं काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत. ट्रॅक टाकणे आणि ओव्हरहे़ड कॅटेनरी सिस्टम संबंधित कामे आधीच पूर्ण झाली आहेत. तसेच आर्किटेक्चरल फिनिशिंगची उर्वरीत कामं आणि सिग्नलिंग कामांसह इतर यंत्रणांचं काम लवकरच पूर्ण केले जाईल.'

गुप्ता पुढे म्हणाले, 'सॉफ्टवेअर अपडेटच्या कामासाठी गाड्या आता अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांनी कार्यरत होणार आहेत. वेळेवर काम पूर्ण होण्यासाठी एमएमआरसीने कमिशनर ऑफ मेट्रो रेस सेफ्टीकडे अर्ज पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मेट्रो अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुला करण्यापूर्वी सीएमआरएसकडून अंतिम मंजूरी आवश्यक असेल. यावेळी मंजूरीची प्रक्रिया जलद होण्याची अपेक्षा आहे.

कारण रोलिंग स्टॉकचं काम आरे- जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलआर) बीकेसी सेक्शन फेझ १मध्ये पूर्ण झालं आहे. एमएमआरसी एकाचवेळी नवीन टप्प्यासाठी ऑपरेशनल तपशीलांना अंतिम रूप देण्यात येणार आहे. यात मेट्रो ट्रेक आणि मेट्रो वेळापत्रक या गोष्टींचा समावेश असेल. मेट्रो ३ च्या फेझ १ नेटवर्कचं काम ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू करण्यात आले होते'.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत संबोधित करताना घोषणा केली की, 'बीकेसी ते कुलाबा जोडणारा पुढील भाग मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे'. यामुळे मुंबईकरांचा सुखकर प्रवास होईल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT