New 8 Lane Mumbai Pune Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

New Mumbai- Pune Expressway: गुड न्यूज! मुंबईवरुन पुण्याला पोहचा फक्त ९० मिनिटांत, तयार होतोय नवा ८ पदरी 'एक्स्प्रेस वे'

New 8 Lane Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास लवकरच ट्रॅफिक फ्री आणि सुसाट होणार आहे. कारण मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेला समांतर असा नवा एक्स्प्रेस वे तयार होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात होईल.

Priya More
  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर नवीन एक्स्प्रेस वे होणार तयार

  • या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त ९० मिनिटांत पूर्ण होणार

  • एक्स्प्रेस वे १३० किमी लांबीचा आणि ८ पदरी असणार

  • रायगडमधील चौक ते पुणे बाह्यवळण मार्ग असा हा मार्ग असणार

मुंबई-पुणे असा नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई- पुणे प्रवास फक्त ९० मिनिटांचा होणार आहे. मिसिंग लिंकनंतर मुंबई- पुणे महामार्गावर आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सरकारने आणखी एक नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला समांतर असा नवीन एक्स्प्रेस वे तयार करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेला आणखी एक समांतर एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी प्रकल्प विकास आराखडा आणि व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागवला आहे. या नवीन एक्स्प्रेस वेमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना ना वाहतूक कोंडीची समस्या होणार ना अपघाताचे टेन्शन वाहन चालकांना राहणार आहे.

नवीन तयार होणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा १३० किलो मीटर लांबीचा असणार आहे. हा एक्स्प्रेस वे कुठून कसा जाणार याचा देखील प्लान तयार झाला आहे. रायगड जिल्ह्यातील चौक येथून या एक्स्प्रेस वेला सुरूवात होईल. जेएनपीटी बंदर (पोगोटे) ते चौक या महामार्गाशी एक्स्प्रेस वे जोडला जाईल. हा नवा एक्स्प्रेस वे चौकपासून ते डायरेक्ट पुणे बाह्यवळण मार्गावर भोरमधील शिवरे या गावाशी जोडला जाईल. नव्या एक्स्प्रेस वेमुळे मुंबई-पुणे प्रवास सुसाट होईल. पुणे ते अलट सेतू जलद जोडणी होईल. औद्योगिक आणि मालवाहतूक क्षेत्राला चालना मिळेल. सध्याच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ताण कमी होईल. मुंबई, पुणे, रायगड, नवी मुंबई ही शहरं जवळ येतील आणि त्यांच्या विकासाला चालना मिळेल.

महत्वाचे म्हणजे, नवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे पुणे अटल सेतूसोबत जोडले जाणार आहे. या एक्स्प्रेस वेसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. नवीन एक्स्प्रेस वे ८ पदरी असणार आहे. हा एक्स्प्रेस वे प्रवेश नियंत्रित म्हणून विकसित केला जाणार आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, जेएनपीटी बंदर, पुणे, औद्योगिक कॉरिडॉर यांच्यातील मालवाहतूक सुसाट होईल. नवीन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा नवीन मुंबई -बंगळुरू एक्स्प्रेस वेचा भाग असणार आहे. यामुळे भविष्यात मुंबईवरून बंगळुरूला फक्त ६ तासांत पोहचता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: जीरा वॉटर की चिया सिड्स? वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन ठरेल बेस्ट?

Face Care: महागड्या फेशियलची काय गरज? घरच्या घरीच 'हा' फेसमास्क लावून मिळवा गुलाबी मुलायम त्वचा

डब्यांवर तेलकट, पिवळे डाग एका मिनिटात होतील गायब! वापरा हे भन्नाट उपाय

Drinking Water Advice: कडक उन्हातून घरी गेल्यावर लगेच घटाघट पाणी पिताय? सावधान! या ४ गोष्टी आताच टाळा, अन्यथा...

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय कान्ससाठी राहते 'या' आलिशान हॉटेलमध्ये; एका दिवसाचा खर्च तब्बल १,५०,००० रुपये

SCROLL FOR NEXT