Navi Mumbai News, Nerul Police Saam Tv
मुंबई/पुणे

MBBS Students : 'एमबीबीएस' च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तीन कोटी तीस लाखांची फसवणूक; पाच अटकेत

नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा घेऊन सोशल माध्यमाचा वापर करुन विद्यार्थ्यांना संपर्क साधला जायचा.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Nerul Police News : एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन गरजु विदयार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नेरुळ पोलिसांनी परदाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करत पाच संशयितांना अटक केली. (Maharashtra News)

नेरुळमधील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात (D.Y.Patil Medical College) ऍडमिशनचे अमिश दाखवून छत्तीसगड मधील विनोदनी यादव यांची तब्बल 33 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी यादव यांनी पाेलिसांत (police) तक्रार नाेंदवली.

पोलिसांनी तांत्रिक तपास करत पाच संशयितांना अटक केली. या टोळी मार्फत नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा घेऊन सोशल माध्यमाचा वापर करुन विद्यार्थ्यांना संपर्क साधला जायचा. विद्यार्थी व पालक आपल्या जाळ्यात अडकताच संबंधित चोरटे वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात आपली ओळख असल्याचे भासवत.

यासोबतच मेडिकल कॉलेजचे बनावट लेटर हेड, शिक्का आणि ई-मेल आयडीचा वापर करुन विद्यार्थी (students) व पालकांचा विश्वास संपादन करत होते. पैसे मिळताच हे सर्व संशयित रफू चक्कर होत होते.

या टोळीने आतापर्यंत मुंबई (mumbai), नवी मुंबई (navi mumbai), अलिबाग आणि भंडारा मधील नामांकित वैद्यकीय कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्याच्या बहाण्याने याब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहेे अशी माहिती मिलिंद भारंबे (नवी मुंबई, पोलीस आयुक्त) यांनी दिली. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT