NEET paper leak saam tv
मुंबई/पुणे

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील तीन महिलांचा सहभाग उघड झाला असून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे आणि मनिषा हवालदार यांच्या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून या प्रकरणाचे पाळंमुळं पुण्यातच असल्याचं उघड झालंय. त्यामुळे सीबीआयनं आपला तपास पुण्याभोवतीच केंद्रीय केलाय. नीट परीक्षेचा पेपर फोडण्यामागे पुण्यातील तीन महिलांचा सहभाग असल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही महिलांची नावं मनिषाच आहे. या तीन महिला नेमक्या कोण आहे ते जाणून घेऊया

पहिली मनिषा वाघमारे

वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या विद्यार्थ्यांना किंबहुना डॉक्टरला NEET पेपर पुरवल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मनिषा वाघमारेला बिबेवाडी परिसरातून बेड्या ठोकल्या. पेशाने ब्युटिशन असलेली मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवायची.

दुसरी आहे मनिषा मांढरे

गेल्या 24 वर्षांपासून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवणारी मनिषा मांढरे NTA ची सदस्य होती. पेपरफुटीचा पुरावा सापडू नये म्हणून मनिषा मांढरेनं सर्व प्रश्न पाठ करून घेतले होते. तीही सीबीआयच्या कोठडीत आहे.

तिसरी आहे मनिषा हवालदार

पुण्यातील सेठ हरिलाल सराफ प्रशालेची मुख्याध्यापिका होती. मनिषा हवालदारची NTAवर भौतिकशास्त्राची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे NEET परीक्षेच्या प्रक्रियेत तिचा थेट सहभाग होता. हवालदारनं भौतिकशास्त्राचे प्रश्न फौडून मनिषा मांढरेला पुरवल्या उघड झालंय. त्यामुळे तिलाही सीबीआयनं अटक केलीय.

मनिषा वाघमारे आणि मनिषा मांढरे या दोघी एकाच इमारतीत राहत असल्याचं स्पष्ट झालंय. तर मनिषा हवालदारही त्यांच्याच परिसरात वास्तव्याला आहे. त्यामुळे या तिघी आधीपासूनच संपर्कात होत्या का ? त्यांनी केवळ यंदाच्याच नीटचा पेपर फोडलाय की आधीही अशा कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे याचाही तपास करणं गरजेचं आहे. एकीकडे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून 'नीट' परीक्षेची तयारी करतात. मात्र, पुण्यातील या तिन्ही 'मनिषां'नी पैशांच्या मोहासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या नीट उत्तीर्ण होण्याच्या मनिषेला सुरूंग लावलाय आणि त्यांची स्वप्न उद्ध्वस्त केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT