Nilam Gorhe Reaction On Kirit Somaiya Video: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा मुद्दा सध्या पावसाळी अधिवेशनामध्ये चांगला गाजत आहे. या मुद्द्यावरुन विधानपरिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी 'हा व्हिडिओ बघणं माझ्यासाठी खूप कठीण परीक्षा.' असल्याचे मत व्यक्त केले आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी अध्यक्षांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि सखोल स्तरावर चौकशी होईल अशी घोषणा केली.
त्यानंतर या मुद्द्यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, 'हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणार आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं- मुली आणि बाकीची लोकं असतात. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना थोडेफार बंधन ठेवा.'
'पोलिसांचा तपास होईल त्यावेळी मिळणारी माहिती देखील माध्यमांनी गोपनीय स्वरुपात द्यावी. जेणेकरुन त्या पीडीत महिलेपर्यंत पोहचेल. ही अंत्यत चिंताजनक गोष्ट आहे. तुम्ही पेनड्राईव्ह मला दिला आहे. तो बघणे माझ्यासाठी कठीण परीक्षा आहे. हा व्हिडिओ महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवरांना बघायला सांगून मी त्यांचे मत घेईल. पण हे तपासून त्यामधून निघणार काय आहे? त्यासाठी महिलेची तक्रार आली पाहिजे. ', असे मत निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
तसंच, 'सभागृहातील चर्चा ती महिला ऐकत असेल, तिला काय वाटत असेल तर तिने या सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात. ते एकून अनेक पीडित महिलांनी मला, फडणवीसांना संपर्क केला आहे. लोकांना अजूनही आमच्यावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. जर या विश्वासाचा घात कुठे होत असेल तर त्यावर गृहमंत्र्यांनी जी चौकशी जाहीर केली आहे ती खूप मोठी गोष्ट आहे.', असे देखील निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.