Jammu- Kashmir News: जम्मू-काश्मीरमधून (Jammu- Kashmir) एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीमध्ये लष्कराला (Indian Army) मोठे यश आले आहे. सिंधरा भागात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu-Kashmir Police) आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत हे मोठे यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सिंधरी भागात चार दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. पहाटे पाच वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती. भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.
सुरक्षा दलाने घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सध्या घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरु आहे. अनेक तास चाललेल्या या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (जम्मू झोन) मुकेश सिंह यांनी दिली. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सुरक्षा दलांमधील पहिली चकमक सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास झाली. या दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
या कारवाईत ठार झालेले दहशतवादी हे विदेशी दहशतवादी असण्याची शक्यता असून त्यांची ओळख पटवली जात असल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी लष्कर आणि पोलिसांनी 2 आयईडी जप्त केले होते. वोधपुरा येथून हे आयईडी जप्त करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्वीट करून याची माहिती दिली होती.
दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी यापूर्वी 5 दहशतवाद्यांना अटक केली होती. यासोबतच या दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांना बडगाम जिल्ह्यातून अटक केली होती. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील खग परिसरात पोलीस आणि लष्कराने या 5 दहशतवादी साथीदारांना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.