डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या विभाजनाची गरज; दिव्यात नवीन पोलीस स्थानक? प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या विभाजनाची गरज; दिव्यात नवीन पोलीस स्थानक?

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवली : डोंबिवली मानपाडा हद्दीत चोऱ्या, मारामाऱ्या नेहमीच होत असतात त्यात आता सामूहिक बलात्कार प्रकरण त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आले. यापूर्वीही मानपाडा पोलिस स्टेशन काहींनाकाही घटनेने चर्चेत असायचे. मात्र आता या पोलीस स्टेशनचे विभाजनची गरज आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे बारा लाख लोकसंख्या आहे, तर 140 पोलिस कर्मचारी सेवेत आहेत. तर दुसरीकडे दिवा शहरात नवीन पोलीस स्थानक गरजेचे आहे. दिवा शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख झाली आहे. त्यांना पोलीस स्थानकात जायचे असेल तर मुंब्रा गाठावे लागते. मानपाडा पोलीस हद्द आणि दिवा हे दोन्ही कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतात. गेल्या 8 वर्षात या परिसरात मोठ्या लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे पोलिस वाढणे जरुरीचे झाले आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कल्याण ग्रामीण हद्दीत दिवा येथे 1 व मानपाडा हद्दीत दोन पोलिस स्टेशन व्हावे म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे पोलिसांनीही मान्य केले आहे. पोलीस स्टेशनचे प्रस्ताव ठाण्यापर्यंत आला आहे, पुढे काय होते पाहू.तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की मानपाडा पोलिस स्थानकावर प्रचंड ताण आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे बारा लाख लोकसंख्या आहे,तर 140 पोलिस कर्मचारी सेवेत आहेत.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण पडतो आहे.

काटई आणि दावडी या ठिकाणी नवीन दोन पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी आहे,याबाबत गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करू.त्याचप्रमाणे दिवा भागासाठी नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे साठी प्रयत्न करणार असे सांगितले.त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणूकी आधी तरी नवीन पोलीस स्टेशन बनतील का हे पाहावे लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Video: किळसवाणा प्रकार! तुम्ही खात असलेल्या फळांवर लघुशंका? लघुशंका करुन त्याच हाताने फळविक्री

Cancer Moonshot : काय सांगता, जग कॅन्सरमुक्त होणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आखली मोठी योजना, पाहा व्हिडिओ

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT