Nana Patole On Republic Day 2022
Nana Patole On Republic Day 2022 Saam Tv News
मुंबई/पुणे

Republic Day 2022: देशाचं स्वातंत्र्य धोक्यात! गेल्या ७ वर्षांत देशाचं चित्र बदललं - नाना पटोले

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवं असं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सांगत असतील की केंद्र सरकारचा आमच्यावर दबाव आहे तर संवैधानिक व्यवस्था आज धोक्यात आली आहे असंही पटोले म्हणाले. आज भारताचा ७३ वा प्रजसत्ताक दिन (Republic Day) आहे, यानिमित्त बोलत होते. (Republic Day 2022: Independence of the country in danger! In the last 7 years, the picture of the country has changed - Nana Patole)

हे देखील पहा -

केंद्रावर टीका करताना ते म्हणाले की, मागील सात वर्षात देशाचे चित्र बदलले. देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, त्यामुळे आपण सावध रहायला हवं असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल अडीच महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले याबाबत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पाळले तर भाजपला काय त्रास होतोय, भाजपच्या पोटात दुखतंय असा टोला त्यांनी लगावला आहे. मालेगावमधील काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल पटोले म्हणाले की, हे चालत राहणार. कोण इकडे येणार, कोण तिकडे जाणार यात टेन्शन घेण्याचे कारण नाही.

टिपू सुलतान नावाचा वादाबाबत नाना पटोले म्हणाले की, जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्मांधतेचे वातावरण तयार केले जातेय. गार्डनला नाव देण्याचं काम महापालिकेचे आहे. अस्लम शेख गार्डनचे नामकरण करायला गेले नाहीत. त्यांच्या निधीतून या गार्डनचे सुशोभिकरण केले आहे, त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. तिथे टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून होते असं म्हणत त्यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांची पाठराखण केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

Indi News: मोठी दुर्घटना! यात्रेत रथ अंगावरुन गेल्याने तिघांचा मृत्यू; कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT