Indi News: मोठी दुर्घटना! यात्रेत रथ अंगावरुन गेल्याने तिघांचा मृत्यू; कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील घटना

Karnataka Indi News: इंडी तालुक्यातील लच्चाण गावामध्ये सिद्धलिंग महाराज यांचे देवस्थान आहे. दरवर्षी याठिकाणी मोठी यात्रा भरते. रथोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतून जवळपास २ लाख भाविक उपस्थित होते.
Karnataka Indi News:
Karnataka Indi News:Saamtv

सोलापूर|ता. ३० एप्रिल २०२४

गावच्या यात्रेत रथोत्सवादरम्यान रथ अंगावरुन गेल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकमधील लच्चाण गावात घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकच्या (Karnataka) इंडी तालुक्यातील लच्चाण गावामध्ये सिद्धलिंग महाराज यांचे देवस्थान आहे. दरवर्षी याठिकाणी मोठी यात्रा भरते. १०० वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या रथोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतून जवळपास २ लाख भाविक उपस्थित होते.

यावेळी रथोत्सव सुरू असताना दोरखंड तुटून रथ अंगावरुन गेल्याने तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. बंडप्पा कटकधोंड, शोभू कटकधोंड आणि अभिषेक मुजगुंड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Karnataka Indi News:
Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी इंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी अक्कलकोट तालुक्यातील वागदारी यात्रेत ही रथोत्सवात चेंगरुन मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Karnataka Indi News:
Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com