Election 2022 News, Latest News On OBC Reservation, Latest Politics News  Saam Tv
मुंबई/पुणे

Election 2022 : राष्ट्रवादीचं ठरलं! येत्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार

OBC Political Reservation Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे (OBC Political Reservation) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे. (Latest News On OBC Reservation)

हे देखील पाहा -

राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर

राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्टला मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जूनला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप त्यात बदल करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आता हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान केंद्राची ९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT