मुंबई: राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर आता महाविकास आघाडी विरोधी (MVA) पक्षाच्या बाकावर बसली आहे, तर शिंदे गटाच्या जोरावर भाजप सत्ताधारी बनला आहे. सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याच्या पदासाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर शिवसेनेलाही (Shivsena) विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद हवं आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांमध्ये विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेत्याच्या खुर्चीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. (Maharashtra Legastive Assembly Leader Of Opposition)
हे देखील पाहा -
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही डोळा आहे. विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर डोळा आहे. विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ७८ असते, यामध्ये शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोघांकडेही १०-१० आमदार आहेत. त्यामुळे आमचे सदस्य जास्त असल्याने विरोधीपक्षनेते पद आम्हाला द्या अशी शिवसेनेची मागणी आहे.
नव्या सरकारला सामोरे जाण्यासाठी विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद हाच शिवसेना पक्षाचा एकमेव आवाज असेल असं सेनेचं म्हणणं आहे. सेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितलं की, राष्ट्रवादी देखील या पदासाठी इच्छुक आहे. तर, भाजपशी लढण्यासाठी एकनाथ खडसेंसारखे अनुभवी नेते आहेत असं राष्ट्रवादीने म्हटलंय. दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदासाछी शिवसेना इच्छूक आहे. (Maharashtra Legislative Council News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.