नवाब मलिक - देवेंद्र फडणवीस Saam Tv
मुंबई/पुणे

ED कडे भाजपच्या नेत्यांच्या कारवाईची मागणी राष्ट्रवादी करणार - नवाब मलिक

'मी मरणाला घाबरत नाही ED ने तपास करावा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. या तपासात भाजपचे लोकच आत जातील.'

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात विविध ठिकाणी ED ने छेपे टाकले आहेत. महत्वाची बाब अशी वक्फ बोर्ड हा विभाग अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकले असून हा गैर व्यवहार कोट्यावधींचा झाला होता. याबाबतची तक्रार ईडीकडे दाखल झाल्या होत्या त्यामुळेच ईडीने तपास सुरु केला आहे.

हे देखील पहा -

ED माझ्या घरापर्यंत आली तर स्वागतच -

या सर्व आरोपांना आणि कारवाई ला उत्तर देण्यासाठी नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली (Press conference by Nawab Malik) होती त्यामध्ये त्यांनी सर्व आरोपांच खंडण करत भाजपच्या नेत्यांवरतीच आरोप केले आहेत मलिक म्हणाले 'वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाहीत वक्फ बोर्डाशी संबंधित लोकांच्या घरी छापे पडले आहेत पुणे येथील ताबूत इनाम इंडोमेन्ट ट्रस्ट ता. मुळशी वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झालेली ही ट्रस्ट आहे.तसेच काही न्युज चॅनलने नवाब मलिक यांच्या घरापर्यंत ईडी पोहचेल असे सांगितले त्याप्रमाणे ED माझ्या घरापर्यंत आली तर स्वागतच करेल.

वक्फ बोर्डाचे कामकाज ऑनलाईन -

तसेच वक्फ बोर्ड माझ्याकडे आल्या नंतर पारदर्शक कारभार कसा होईल यासाठी कवायत सुरू आहे. आज ED कारवाई करत आहे याचे स्वागत आहे. हजार वक्फ बोर्डाच्या संस्था आहेत याची ईडी ने चौकशी करावी असं मलिक म्हणाले. पुणे, बदलापूर, बीड, परभणी, जालना, येथे वक्फ बोर्डाकडून फसवणुक झाल्याबाबत FRI दाखल करण्यात आले आहेत. यासाठी वक्फ बोर्डाचे कामकाज ऑनलाईन Online करणार असून काही फाईल गहाळ झाल्याचे प्रकरण समोर येत असल्याचं ते म्हणाले.

मला बदनाम करण्यासाठी ईडी चा वापर -

दरम्यान गेल्या 30 दिवस क्लीनअप अभियान (Cleanup campaign) सुरू केलं आहे. काही लोक आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केंद्रीय यंत्रणांमध्ये जी घाण होती ती क्लीन करण्याचे काम आम्ही करत आहोत असा टोला त्यांनी अप्रत्यक्ष वानखेंडेंना Wankhede लगावला. तसेच मला बदनाम करण्यासाठी ईडी चा वापर केला जात असेल तर मी घाबरणार नाही. एक कोणी भाजपचा नेता पोस्ट टाकतो नवाब मलिकच्या घरात ईडी जाईल. मी मरणाला घाबरत नाही ईडीने तपास करावा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. या तपासात भाजपचे लोकच की आत जातील.

भाजपच्या नेत्यांच्या कारवाईची मागणी -

सिया बोर्डा विषयी जी कारवाई केली जात आहे ती शांततेत सुरू आहे. सिया बोर्डाची ही चौकशी करावी. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून ही कारवाई सुरू आहे याबाबत ईडी ने स्पष्टता द्यावी. हरियाणा नेते आणि मुंबईतील नेते तुरुंगात जातील. तसेच राष्ट्रवादी चे नेते, मंत्री ED ची वेळ घेऊन संपूर्ण माहिती देणार आहोत. भाजपच्या ज्या मंत्री,नेते याच्यावर ईडी मध्ये तक्रार दाखल आहे त्यांची माहिती आम्ही ईडी ला देणार. EDने कारवाई अधिक गतीने करावी अशी मागणी आम्ही करणार माझा अन्याय विरोधातील लढा सुरूच राहणार असल्याच त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कुठल्यातरी कबाडी खाण्यातुन कागदपत्र आणतात आमच्याकडे पक्के कागदपत्र आहेत असा टोलाही त्यांनी सोमय्यांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT