Eknath Shinde, Raj Thackeray, Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'युती झाली असेल तर ती जगजाहीर करा, कटकारस्थान करू नका'

आज दिवाळीनिमित्ताने मनसेच्या दीपोत्सवात दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजप (BJP) आणि मनसे या दोन पक्षांमधील जवळीक वाढली आहे. त्यातच आज दिवाळीनिमित्ताने मनसेच्या दीपोत्सवात दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकाच मंचावर आले. त्यामुळे ही महायुतीची नांदी तर नाहीये ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या नव्या राजकीय महायुतीबाबत राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. (Raj Thackeray News Today)

भाजप आणि मनसेत युती आहे का ? छुपी युती असेल तरी जगजाहीर करा आणि युती झाली नसेल तरी जगजाहीर करा, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही एकत्रित आले आहात का ? तुमची युती झाली असेल तर ती जाहीर करा, छुपी युती करून नंतर म्हणू नका युती नव्हतीच असेही म्हंटले आहे.

दिवाळीच्या कार्यक्रमात कोणी कुठेही जाऊ शकतं, मात्र मनसेच्या सुख दुखात तुम्ही जात आहात यासाठी आमच्या सदिच्छा असल्याचा टोलाही रुपाली पाटील यांनी लगावला आहे. खरंतर रूपाली पाटील या मनसेत असताना त्यांनी अनेकदा आक्रमक भाषेत भाजपवर टीका केली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या संयमाने प्रतिक्रिया देत टीका करताना दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं, यंदा या दीपोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे. यावेळी मनसेकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याचं पहायला मिळालं.

'राज ठाकरेंनी मदतीसाठी कधीही आमच्याकडे यावं'

राज ठाकरेंनी मदतीसाठी रात्री-अपरात्री कधीही आमच्याकडं यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT