Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: राज्यातील जनतेच्या मनात भाजप नाही; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Sharad Pawar News: 'राज्यातील जनतेच्या मनात भाजप नाही, आता निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

Sharad Pawar News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं भाष्य केलं आहे. शरद पवारांनी कर्नाटकात मे महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचा हवाला देत मोठं वक्तव्य केलंय. 'राज्यातील जनतेच्या मनात भाजप नाही, आता निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 'इंडिया टुडे कॉन्क्लेव'ला हजेरी लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी देशातील राजकारणावर भाष्य केलं. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील ७ पैकी ३ जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी यावेळी केला.

आप खासदार संजय सिंह यांच्या कारवाईवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'ईडीकडून करण्यात येणारी कारवाई ही ज्या नेत्यांसाठी आहे. जे नेते सरकारच्या इशाऱ्यानुसार चालत नाहीत'.

तत्पूर्वी, राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं. 'महाराष्ट्रातील जनतेचा मूड भाजपसाठी अनुकूल नाही. आता निवडणुका झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मिळून सत्ता स्थापन करेल, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.

उद्योजक गौतम अदानी यांच्यावर राहुल गांधी टीका करतात. मात्र, शरद पवारांचे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यावर भाष्य करताना ते म्हणाले, 'राहुल गांधी यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, राहुल गांधी देशाच्या विकासासाठी त्यांचं समर्थन देखील करु शकतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT