Shinde Group vs MNS: 'केक कापून कुणी खासदार होत नाही'; शिंदे गटाचा मनसे आमदारावर पलटवार

Shinde Group vs MNS: 'केक कापून कोणी खासदार होत नसून त्यासाठी काम करावं लागतं, अशा शब्दात शिंदे गटाच्या नेत्याने मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
Shrikant Shinde Vs Raju Patil
Shrikant Shinde Vs Raju PatilSaam TV
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News:

मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. राजू पाटील यांच्या टीकेचा काल श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता खरपूस समाचार घेतला. दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांचं ट्वीटरवर राजकीय वॉर रंगलं आहे.

'केक कापून कोणी खासदार होत नसून त्यासाठी काम करावं लागतं, अशा शब्दात शिंदे गटाच्या नेत्याने मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गट आणि मनसेमध्ये ट्विटरवर राजकीय वॉर सुरु झाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेना शिंदे गट युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी राजू पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

Shrikant Shinde Vs Raju Patil
Nanded News: 'मी जातीय भावनेतून काही केलं नाही', त्या घटनेवर खासदार हेमंत पाटील यांचं स्पष्टीकरण

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपेश म्हात्रे म्हणाले, 'केक कापून कोणी खासदार होत नसतो, त्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं. खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभेत मोठ्या प्रमाणात काम करतात. काही लोकांनी बिल्डरांकडून पॉकेटमनी घेऊन सर्वसामान्य शेतकरी भूमिपुत्र यांचे पाकीट मारले आहेत. ते लोक आज लोकसभा लढायची भाषा करत आहेत'.

'त्यांनी 2014 साली काय झालं होतं हे आठवावं. काही लोक लोकसभा लढविण्याची स्वप्न बघत राहिले तर आजीचे माजी होतील, असा पलटवार म्हात्रे यांनी नाव घेता मनसे आमदारांवर केला आहे.

'लोकसभेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे भूतो न भविष्यतो मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास देखील म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com