MNP Protest : मनसेचा Airtel ला दणका; कार्यकर्त्यांची मालाड येथील एअरटेल कार्यालयावर धडक, काय आहे प्रकरण?

MNS News : एअरटेलने गुजराती भाषेत जाहिरात दिल्याने मनसेने मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
MNS-Raj Thackeray
MNS-Raj ThackeraySaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News :

मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने घर नाकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा देखील दिला. आता मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेने एअरटेलला दणका दिली आहे.

एअरटेलने गुजराती भाषेत जाहिरात दिल्याने मनसेने मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसे विद्यार्थी संघटनेचे नेते अखिल चित्रे, सतीश नारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेल कंपनीच्या कार्यालयातील मॅनेजमेंटला गुजराती जाहिरातीबाबत जाब विचारला. (Latest Marathi News)

MNS-Raj Thackeray
Shinde Group vs MNS: 'केक कापून कुणी खासदार होत नाही'; शिंदे गटाचा मनसे आमदारावर पलटवार

महाराष्ट्रात मराठी भाषा दुर्लक्षित करून गुजराती भाषेला गोंजारणाऱ्या एअरटेलला मनसेने इशारा दिला. मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन माफी मागण्यास सांगितले असून गुजराती भाषेतील जाहिरात देखील हटवण्याची मागणी केली आहे. एअरटेलने देखील ती जाहिरात सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकू, पुन्हा अशी चूक होणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

इतर भाषांना आमचा विरोध नाही. मात्र त्या भाषा आमच्यावर लादणे चुकीचे असून ते आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात मराठी भाषा वापरली गेली पाहिजे. गुजरातमध्ये ते मराठी भाषा वापरतात का? त्यामुळे कंपनीने तात्काळ त्या जाहिराती थांबवाव्यात अन्यथा त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे अखिल चित्रे यांनी सांगितले.

MNS-Raj Thackeray
Sanjay Singh Arrested: मोठी बातमी! आप खासदार संजय सिंह यांना ईडीने केली अटक, काय आहे प्रकरण?

हे मुद्दामहून सुरु आहे का?

मनसेने आपल्या अधिकृत X अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं की, हे मुद्दामहून सुरु आहे का? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com