NCP/BJP Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; कार्यालयाचीही तोडफोड

भाजपच्या माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह काही जणांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पदाधिकारी आप्पा जाधव यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आप्पा जाधव यांच्या नारायण पेठेतील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. असून ही माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्यंतरी भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कानशिलात आप्पा जाधव (Appa Jadhav) यांनी लगावली होती. त्यामुळे त्यांना मारहाण झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

या मारहाण आणि तोडफोड प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambag Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, या प्रकारामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

जाधव हे राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणी म्हणून कार्यरत असून. जाधव नारायण पेठेत येणाऱ्या चौकात हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. जाधव हे त्यांच्या कार्याकर्त्यांसमवेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातं जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये जाधव यांना जबर दुखापत झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT