Uddhav thackeray And supriya sule  Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने बंडाळीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठं पक्षसंकट उभं ठाकलं आहे. गुवाहाटीतील बंडखोर आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आवाहनाला प्रतिसाद देतात का,याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे. (Supriya sule Latest news In Marathi )

सुप्रिया सुळे म्हणाल्या,'मला उद्धव ठाकरे यांचा खूप अभिमान वाटतो. घरातला मोठा भाऊ कसा असावा ? तर तो उद्धव ठाकरे सारखा असावा. तसेच मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखाच असावा. मला आज आवर्जून माँ आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. माँ यांची संवेदनशीलता उद्धव ठाकरे यांच्या कृतीमध्ये दिसते. राजकारणात यश अपयश, चढ-उतार येत असतात. मात्र,शेवटी माणसं आणि नात्यातला ओलावा हाच आयुष्यात टिकतो.

बाळासाहेबांनी जे प्रेम सगळ्यांना दिलं, त्याची मी देखील उपभोक्ता आहे. बाळासाहेबांनी माझ्यावरही लहानपणांपासून प्रचंड प्रेम केलं आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंची निवड केली. त्यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी सोपावली. आज उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत असेल, तर ते एक मोठं आवाहन आहे'.

गुवाहाटीतील आमदार परत येतील का ? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मी ज्योतिषी नाही. पण कुठल्याही घरात भांड्याला भांड लागलं तर घरात भांड्याला भांड लागलं तर एखादा मुलगा किंवा मुलगी रुसून गेली तर आई वडील प्रश्न सोडवतात'.

'भाजपला बैठक घ्यायला अधिकार आहे. आमचं दडपशाही सारखं सरकार नव्हतं , कधीही असणारही नाही . त्यामुळे भाजपला बैठका घेण्याचा अधिकार आहे. मी काही देवेंद्र फडणवीस यांची ट्रॅव्हल एजंट नाही. त्यामुळे ते कुठे आहेत मला माहित नाही,असे म्हणत सुळे यांनी भाजपच्या बैठकांवर प्रतिक्रिया दिली.

'निधीबाबत नाराजी व्यक्त केली असे बंडखोर आमदार यांनी प्रतिक्रिया दिली, पण डेटा आहे कोणा कोणाला किती निधी दिला ते स्पष्ट झालेलं आहे. जीआर हा जनतेसाठी असतो. कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नसतो. उलट तुम्ही स्तुती करायला हवी की इतके जीआर मंजूर झाले', असेही त्या म्हणाल्या.

'जे राष्ट्रवादी विरोधात बोलतात ते बंडखोर आमदार आधी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, हे विसरून चालणार नाही. आम्ही कुठल्याही नात्यात कटूता आणली नाही, ते पक्ष जरी सोडून गेले असले तरी आमच्या मनात यांच्याबाबत प्रेमाची भावना आहे. कधीतरी नात्यांमध्ये आपण एकत्र ताटात जेवलो, तर त्या मिठाला जागायची सवय ही माझी स्वतःची संस्कृती आहे. खंत गोष्टीची वाटते की, जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले, त्यांचाही आम्ही नेहमीच मान सन्मान केला. कितीही मतभेद असतील तरी चर्चेतून मार्ग निघतो', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'ईडी आता पार गावापर्यंत पोहोचली. गावातल्या मुलांना सुद्धा माहिती आहे की ईडी काय आहे ? या राज्यात विरोध केला तिथे लगेच ईडी कडून नोटिसा पाठवल्या जातात. दुनिया उमीद पर कायम है, आशा आहे बघू काय होत', असे भाष्य ईडीवर यावेळी सुप्रिया सुळे यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT