Uddhav Thackeray: मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंच्या खात्याच्या सर्व फाईली मागवल्या

Political Crisis In Maharashtra : १ जून पासून नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मागवल्या आहेत.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीचा आजचा आठवा दिवस आहे. आठ दिवसांनंतरही बंडखोरी शमत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अॅक्शन मोडमध्ये आलेले आहे. बंडखोरीचे सर्वेसर्वा असलेले नगरविकास मंत्री यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या सर्व फाईली मागवून घेतल्या आहेत. १ जूनपासून नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मागवल्या आहेत. याबाबतत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला निर्देश दिले आहेत. (Uddhav Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

महाविकास आघाडी आणि शिवसेने विरोधात बंड करणारे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे गेली आठ दिवस राज्याबाहेरच आहेत. २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर रात्री ते नॉट रिचेबल झाले. त्यांतर २२ तारखेपासून ते गुवाहातील रेडीसन ब्ल्यू या पंचतारांकीत हॉटेलात तळ ठोकून आहेत. सोबतच शिवसेनेचे जवळपास ४० आमदार आणि इतर १० आमदार त्यांच्यासोबत इथेच थांबले आहेत. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे तर मविआ सरकारही कोसळण्याच्या स्थितीत आहे. अशाच बंडखोरी मोडण्यासाठी शिवसेनेकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यानुसार मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे असलेलं नगरविकास या खात्याच्या सर्व फाईली मागवल्या आहेत.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरुन शिवसेनेला पुन्हा आव्हान, म्हणाले...

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षभरापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवणार होते. भाजपशी युती तोडत 2019 मध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाण्याचं ठरवलं. त्यानंतर तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी तरीही भाजपसोबत जवळीक ठेवली. शिंदे यांनी ठेवलेली भाजपशी जवळीक ठाकरे यांना आवडत नव्हती. यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवणार होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षातूनच जोरदार हालचाली सुरू होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com