Sharad PAwar, Ajit Pawar, Supriya Sule  Saam TV
मुंबई/पुणे

Political News : पवारसाहेब ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्यामागे घराणेशाही नव्हती; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला

Supriya Sule in Ajit Pawar : बारामती, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मी आभार मानते. त्यांच्या आशीर्वादाने पवार साहेब ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते.

प्रविण वाकचौरे

Political News :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षफुटीवर बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला होता. मी भूमिका साठी पार झाल्यावर घेतली. काहींनी तर ३८ व्या वर्षी घेतली, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवार यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवार साहेबांनी ३८व्या वर्षी जी भूमिका घेतली, त्यावेळी त्यांच्या मागे आपल्यासारखी घराणेशाही नव्हती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पवार साहेबांनी ३८व्या वर्षी काय निर्णय घेतला याची मला फारशी माहिती नाही. बारामती, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मी आभार मानते. त्यांच्या आशीर्वादाने पवार साहेब ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आजही तरुण मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घराणेशाहीतून ते आले नव्हते

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या आणि दादासारखे (अजित पवार) घराणेशाहीतून आले नव्हते. तसं लेबलही त्यांच्यावर लागलं नव्हतं. स्वत:च्या कर्तृत्वावर ते सर्वात युवा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर ते तीन वेळा मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या मायबाय जनतेची साथ त्यांना मिळाली होती. (Latest Marathi News)

दादांनाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी

राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. ते आपण अजितदादांकडे मांडूयात. राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी. दुधाचा प्रश्न आहे, शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न, महागाई, बेरोजगारी असे अनेक विषय आहेत.

आरक्षणाचा विषय आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहे, त्याचाही आढावा अजितदादांनी मोदी-शाहांकडे घ्यावा. जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल, तर जनतेच्या आशीर्वादाने दादांनाही राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आनंदच होईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT