supriya sule  saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule On Mira Road Case: 'लिव्ह-इन'मधील प्रेयसीची हत्या केली, तुकडे करून कुकरमध्ये शिजवले; मीरा रोड प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule Tweet: माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला.

Priya More

Mira Road Live In Partner Killed Case: मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 32 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने कटरने प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर त्याने ते कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्याला खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Case) प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मीरारोड प्रकरणावर ट्वीट करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'मुंबई येथील मीरारोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.'

'गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे.', अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, मीरा रोडच्या गीतानगर फेज 7 मधील गीता आकाश दीप इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी मनोज साहनी (56 वर्षे) आणि सरस्वती वैद्य (32 वर्षे) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी भाड्याने राहत होते. या दोघांमध्ये या नाही तर त्या कारणांमुळे सतत भांडणं होत होती. त्यामुळे मनोजने धारधार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर त्याने कटरच्या सहाय्याने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले.'

सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने सुरुवातीला काही तुकडे कुकरमध्ये टाकून शिजवले आणि कुत्र्याला खायला घातले. तर काही भाग मिक्सरमध्ये टाकून बारीक केले. आरोपीची घरातून दुर्गंधी येत होती. तसंच त्याच्या संशयास्पद हालचालीवरुन त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याबद्दल पोलिसांना सांगितले. नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोजला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT