Rohit Pawar Latest News in Marathi, Karjat Latest News, Jamkhed Latest News, Rohit Pawar In Nagpur  Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; ग्रीन एकर कंपनीची ED कडून चौकशी

ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले

सूरज सावंत

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून (ED) देण्यात आले आहे. येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान सुद्धा या कंपनीत सहभागी होते. त्यामुळे या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्यात यावी, असे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. (Rohit Pawar News Today)

दरम्यान, सध्या ग्रीन एकर या कंपनीचे प्राथामिक चौकशीचे आदेश ईडीने दिले असले, तरी यात जर काही गैरप्रकार आढळला तर आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 या कालावधीत संचालक होते.

त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा 2006 ते 2009 पर्यंत कालावधीत कंपनीचे संचालक राहिलेले आहेत. ग्रीन एकर कंपनी ही आमदार रोहित पवार यांनी 7 वर्षांपूर्वी स्थापन केली होती. तेव्हा या कंपनीत राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. (Rohit Pawar ED Inquiry News)

मात्र, राकेश वाधवान यांचे येसबँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, ईडीला ग्रीन एकर या कंपनीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार प्राप्त झाल्याची माहिती आहे.

कंपनीत जवळपास 10 कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार झाला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळेच या कंपनीची प्राथामिक चौकशी करावी, असे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT