Rohit Pawar Meets CM And DCM Saam TV
मुंबई/पुणे

Politics: बंद दाराआड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar Meets CM And DCM: एकीकडे रोहित पवार हे मंत्रालयात पोहोचले होते, तर दुसरीकडे, शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं. रोहित पवार यांची मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यासोबत बंद दाराआड काय चर्चा झाली असावी याबाबत अनेकांनी प्रश्न पडला. अखेर रोहित पवार यांनी स्वतः या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. पत्रकारांशी बोलताना आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याबाबत रोहित पवारांनी स्पष्टीकरण देत उलट-सुलट चर्चांना पुर्णविराम दिला आहे. (Rohit Pawar Latest News)

हे देखील पाहा -

रोहित पवार यांच्या पाठीमागे आता ईडीचा ससेमिराला लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय बनली आहे. १० ते १५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

दरम्यान, एकीकडे रोहित पवार हे मंत्रालयात पोहोचले होते, तर दुसरीकडे, शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. "माझं बोट पकडून राजकारणात आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं" असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लगावला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषदही घेतली. यावेळी बोलताना पवारांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT