Dhule News NCP Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत अजित पवारच 'दादा'? प्रदेशाध्यक्ष निवडीआधी बडे नेते भेटीला

Maharashtra Politics: राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

Rashmi Puranik

Mumbai News: राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यध्यक्षांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची आता निवड होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाबाबत चित्र अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा पाहायाला मिळणार आहे. पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याने नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील काही आमदार हे अजित पवारांना भेटणार आहेत.

राष्ट्रवादीतील आमदार अजित पवारांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीतील काही आमदार आणि जिल्हाध्यक्ष अजित पवारांची भेट घेणार घेणार आहेत.

अजित पवारांच्या शासकीय बंगल्यावर खासगी कार्यक्रम

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजूनही निर्णय न झाल्याने भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत सूतोवाच करून देखील अद्याप निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर छोटेखानी खासगी कार्यक्रम असल्याची माहिती आहे.

शरद पवारांनी बोलावली बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहा जुलै रोजी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवार हे पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहे. अजित पवार यांनी पक्षात जबाबदारी द्यावी ही मागणी केल्यानंतर पहिली बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी सहा जुलै रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीआधी काही आमदार अजित पवारांची भेट घेणार आहेत. या बैठकीआधीच अजित पवार शक्तिप्रदर्शन करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांचे समर्थक आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीला कोण कोण उपस्थित आहेत?

खासदार

सुप्रिया सुळे

प्रफुल्ल पटेल

अमोल कोल्हे

आमदार

दिलीप वळसे पाटील

हसन मुश्रीफ

छगन भुजबळ

किरण लहमाटे

निलेश लंके

धनंजय मुंडे

रामराजे निंबाळकर

दौलत दरोडा

मकरंद पाटील

अनुल बेणके

सुनिल टिंगरे

अमोल मिटकरी

आदिती तटकरे

शेखर निकम

निलय नाईक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT