Loksabha Election 2023 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला? उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सुतोवाच

Political News : लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक उमेदवारीबाबत मोठे विधान केले.
Uday Samant on Uddhav Thackeray
Uday Samant on Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Ratnagiri News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना आपली तयारी सुरु केली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. शिवसेनेदेखील (शिंदे गट) आपल्या महत्त्वाच्या नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसे सुतोवाच दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित केला असल्याची यामुळे चर्चा सुरु झाली आहे. लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक, उमेदवारीबाबत मोठे विधान केले. (Latest Marathi News)

Uday Samant on Uddhav Thackeray
Cm Shinde Thackeray Group BMC Morcha: 'आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा', मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल

उदय सामंत म्हणाले की, माझे शासकीय निवासस्थान मुंबईत सध्या मुंबई आहे. पण ते दिल्लीत देखील असले पाहिजे. आपल्या मोठ्या बंधूंच्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Political News)

Uday Samant on Uddhav Thackeray
Rahul Kanal Join Shiv Sena: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कानाल यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना विरुद्ध शिवसेना

रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये राणे कुटुंब आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातला संघर्ष उघड आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांनी २०१९ च्या आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव केला होता. मात्र जर या ठिकाणी किरण सामंत यांना उमेदवारी दिली तर निलेश राणेंचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com