Rahul Kanal Join Shiv Sena: ठाकरे गटाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. आज ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आदित्य ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना राहुल कनाल म्हणाले की, "कोविडच्या काळात सर्वजण लोकांना जेवू घालत होते. पण आम्ही एक प्रयोग केला होता की रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाऊ घालायचं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वांद्र्यातील भागात या कामासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांची हीच सेवाभावी वृत्ती आम्ही शिकलो आहोत. कोविडच्या काळात मी केवळ सेवाच केली मेव्याशी माझा कुठलाही संबंध नव्हता.'' (Latest Marathi News)
ते म्हणले, ''या ठिकाणी दोनतीन दिवसांत मुंबईत बऱ्याच हालचाली घडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी माझ्यावर आरोप केला की मी राजकारण करत आहे. कोणी म्हटलं की पक्षानं तुम्हाला बरंच काही दिलं. १०० टक्के दिलं पण याचं मी एक हजार टक्के परत दिलं. माझे सहकारी आणि वडिलांना एकनाथ शिंदे यांचं काम आवडत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत.''
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, ''राहुलने युवासेनेचे काम केले आहे. आपल सरकार स्थापन होऊन एख वर्ष झाले. आम्ही एक वर्षभरात अनेक कार्यक्रम केले. हे सर्व निर्णय सर्व सामान्य माणसाच्या हिताचे घेतले. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी जे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामध्ये अनेक अनुभव आहे. राहुल कनालला अनेक अनुभव आले असतील कारण तो अगदी जवळ होता.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.