ncp leader suraj chavan said that raj thackeray is owaisi of maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

"राज ठाकरे महाराष्ट्राचे नवे ओवैसी"; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

Suraj Chavan On Raj Thackeray: राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी राज ठाकरेंवर टीका करत हनुमान चालीसा म्हणूम दाखवण्याचं आवाहन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरच्या भोंग्यावरील घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्यावर मविआ नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्राचे नवे ओवैसी असून ते औवेसी (Owaisi) मुस्लिमांना भडकवतात तर राज ठाकरे हिंदुंना भडकवातात असा आरोप करत राज ठाकरेंनी हनुमान चालीसा (Haniman Chalisa) म्हणून दाखवावी असं आवाहान राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केलं आहे. (ncp leader suraj chavan said that raj thackeray is owaisi of maharashtra)

हे देखील पहा -

सूरज चव्हाण म्हणाले की, राज ठाकरे महाराष्ट्राचे नवे ओवैसी आहेत. ते औवेसी मुस्लिम समाजाला भडकवण्याचं काम करायचे आणि राज ठाकरे हिंदु समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत. दोघांचा उद्देश एकच, दोघांची मातृसंस्था एकच. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. अशा विचारांना महाराष्ट्रात थारा दिला जात नाही. विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन राजकारणात उतरलेले राज ठाकरे मातृसंस्थेच्या आदेशामुळे आज ती ब्ल्यूप्रिंट बंद केली आहे. महागाई, बरोजगारी अशा मूळ मुद्द्यांना बगल देऊन हिंदु समाजातील तरुणांची माथी भडकवण्याचं ते काम करत आहेत. राज ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबांना आवाहन आहे की, त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असं आवाहन त्यांनी राज ठाकरेंना केलं आहे.

२ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले २ एप्रिलच्या गुढीपाडव्यातील सभेत म्हटले होते. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. तेव्हापासून मनसेला गळती लागली आहे.

२ एप्रिलच्या उत्तरसभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

ठाण्यात उत्तर सभेचं आयोजन केलं होतं यावेळच्या सभेतील भाषणात बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा विषय लावून धरला. ते म्हणाले, 'मी चुकीचं काय बोललो या मशिदीच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे , घरात करा. शहरातली रस्ते फुटपाथ कशासाठी अडवता प्रार्थना तुमची आहे, आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजावत नसाल, तर तुमच्या मशिदी बाहेर आम्ही हनुमान चालींसा (Hanuman Chalisa) लावणार म्हणजे लावणार असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT