Supriya Sule on Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Supriya Sule News: माझ्या भावाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या वाचा...

Supriya Sule on Ajit Pawar: माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Prachee kulkarni

Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदि मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. (Latest Marathi News)

मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असंही अजितदादा म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी उपाध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. मला मनापासून आनंद आहे की, दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही, तर अजितदादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवी जबाबदारी मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी भाषण करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला विरोधी पक्षनेतेपदावर बसण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणि त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय. पण आता मला या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

विशेष बाब म्हणजे, अजित पवार यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ किती महिन्यांचा आहे, याचा आवर्जून उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार तीन वर्षांनी नवा प्रदेशाध्यक्ष निवडणे अपेक्षित आहे. मात्र, जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी येऊन ५ वर्ष १ महिन्यांचा कालावधी झाला आहे, असं ते म्हणाले होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT