Sharad Pawar Admitted In Hospital Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील 3 दिवस घेणार उपचार

Sharad Pawar Admitted In Hospital: पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

Sharad Pawar News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे पवार यांनी मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल (Admitted In Hospital) करण्यात आलं आहे. याठिकाणी ते पुढील ३ दिवस उपचार घेतील आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (Sharad Pawar Admitted In Hospital)

या प्रसिद्धीपत्रकात लिहीलंय की, आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकऐंशी वर्षांचे आहेत. वाढत्या वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी आहेत मात्र तरिही ते अजूनही राज्यभरात पायाला भिंगरी लावून फिरताना दिसतात. शरद पवार यांच्यात इतका उत्साह कुठून येतो, हे कोडे अनेक राजकारण्यांना आजही पडते.

मी काय म्हातारा झालोय का?

शरद पवार २४ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका शेतकऱ्यांनी शरद पवार यांना विनंती केली. 'साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका', असे शेतकऱ्याने म्हटले होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेतली. तुम्हाला कोणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुला कोण म्हणतं मी म्हातारा झालोय. काय पाहिलं तुम्ही?, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शरद पवारही आपल्या या वक्तव्यावर मनुरादपणे हसले होते. पवार यांची या वयातही असलेली उर्जा ही सर्वच पक्षातील राजकारण्यांना आश्चर्यचकित करते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT