Pune News: पुण्यातील 'या' परिसरातले रस्ते सर्वात खराब; वाहतूक पोलिसांनी खड्डेमय रस्त्यांची यादी थेट महापालिकेला पाठवली

Pune Potholes News: खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आता पुणे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
Bad Roads In Pune
Bad Roads In PuneSaam TV

सचिन जाधव, पुणे

Bad Roads In Pune: पुण्यात ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे. त्यात अनेक भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे पुण्यात (Pune) दररोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी होतात किंवा मरण पावतात. या खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आता पुणे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला पुण्यातील खराब रस्त्यांची सविस्तर यादीच पाठवली आहे. तसेच हे खड्डे (Potholes) लवकरात लवकर बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला केलं आहे. (Pune Latest News)

Bad Roads In Pune
Twitter Blue Tick: ट्विटर विकत घेताच एलन मस्कचा यूजर्सना झटका; Verification Badgeसाठी मोजावे लागणार पैसे

पुणे वाहतूक पोलिसांनी थेट पुणे महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहीलं आहे. यात ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून पोलिस आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेला हे पत्र लिहीलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे अपघात होत आहेत तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. (Maharashtra News)

यावर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून पुण्यातील २४ प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे. आता या पत्रानंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Bad Roads In Pune
धक्कादायक! WiFi चा पासवर्ड न दिल्याच्या रागात दोघांकडून एका अल्पवयीन मुलाची भरस्त्यात हत्या

पुण्यातील कुठल्या भागात किती खड्डे (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)

विभाग आणि खड्डे असणारे एकूण ठिकाणे

- कात्रज विभाग (८ ठिकाणं)

- सहकारनगर (३ ठिकाणं)

- स्वारगेट (३ ठिकाणं)

- सिंहगड रोड (२ ठिकाणं)

- वारजे (३ ठिकाणं)

- कोथरूड (३ ठिकाणं)

- डेक्कन (३ ठिकाणं)

- चतुष्रुंगी (३ ठिकाणं)

- शिवाजीनगर (२ ठिकाणं)

- खडकी (३ ठिकाणं)

- येरवडा (६ ठिकाण)

- विमानतळ (८ ठिकाणं)

- कोरेगाव पार्क (४ठिकाणं)

- लोणीकंद (२ ठिकाणं)

- समर्थ (५ ठिकाण)

- बंडगार्डन (१२ ठिकाणं)

- लष्कर (१)

- वानवडी (६ ठिकाणं)

- कोंढवा (१३ ठिकाणं)

- हडपसर (११ ठिकाण)

- मुंढवा (७ ठिकाण)

- लोणी काळभोर (२)

- सिंहगड रोड (४ ठिकाणं)

Edited By - Akshay Baisane

सविस्तर यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Attachment
PDF
Bad Roads In Pune.pdf
Preview

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com