Abdul Sattar vs Rupali Thombare Saam TV
मुंबई/पुणे

Rupali Thombare : अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; रुपाली ठोबरेंचा इशारा

शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Abdul Sattar Latest News : शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. यांची जीभ घसरली आहे. सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत. सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

अब्दुल सत्तार हे आमच्या सुप्रियाताईंना ज्या भाषेत बोलले. तुमचे विचार किती घाणेरडे आहेत, आपली मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपली तेवढी लायकी आहे का? आपण जे काही बोलता जाणून बुजून हे महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यापुढे तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही माफी देखील मागितली तरी तुमची आम्ही गय करणार नाही. तु्म्ही मंत्री होण्याच्या पात्रतेचे नाही. राजीनामा दिला पाहिजे, असा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी सत्तार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

अब्दुल सत्तार हे सिल्लोड येथे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना कृषीमंत्री सत्तार यांनी हा गलिच्छ शब्दप्रयोग केला आहे. पन्नास खोक्यांच्या मुद्द्यावरुन सत्तारांना प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले आम्हाला बदनाम करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असं म्हणत सुळेंना खूपच वाईट शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर आता विरोधक हे सरकारवर तुटून पडले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनीही सत्तारांना धारेवर घेतलं आहे. तर रुपाली ठोंबरे पाटील यांसह अनेक नेत्यांनी सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT