NCP Nawab Malik  Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik News: नवाब मलिक राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटासोबत जाणार?, समोर आली मोठी अपडेट

NCP Leader Nawab Malik Latest News: नवाब मलिकांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी दोन्ही गटातील प्रमुख नेते त्यांच्या घरी जात आहेत.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) हे मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) दोन महिन्यांचा जामीनावर बाहेर आहेत. सध्या नवाब मलिक हे आपल्या घरी आहेत. जामीनावर बाहेर येताच नवाब मलिकांच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे लक्ष लागले आहे. नवाब मलिकांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी दोन्ही गटातील प्रमुख नेते त्यांच्या घरी जात आहेत. अशामध्ये नवाब मलिक यांनी आपली भूमका स्पष्टपणे सांगितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांचा तब्येतीची विचारपुस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांशी भेटीदरम्यान झालेली राजकीय चर्चा अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. अशामध्ये राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिक यांचा कोणताही निर्णय झालेला नाही.

याच दरम्यान, नवाब मलिक यांचा जामीन आणि अजित पवार गटातील काही नेत्यांनी त्यांची घेतलेली भेट या विषयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नवाब मलिकांना मला राजकारणात अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आज तरी आम्ही त्यांना कोणत्याही स्वरूपाची तसदी देणार नाही. नवाब मलिकांची सुटका झाली याचे आम्हाला समाधान आहे. त्यांना आज विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे नवाब मालिकांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य आणि त्यानंतर राजकारण असे वक्तव्य जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नवाब मलिक तुरुंगातून जामीनावर बाहेर येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), खासदार प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या प्रमुख नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sul) यांनीही नवाब मलिक यांची सोमवारी भेट घेतली होती.

सुप्रिया सुळे यांनी तब्बल चार तास नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली होती. अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना पक्षात येण्याबाबत प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT