Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा आढावा घेणार, उद्यापासून बैठकांचा धडाका

Political News : 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
Uddhav Thackeray On BJP
Uddhav Thackeray On BJPSAAM TV
Published On

गिरीश कांबळे

Mumbai News : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व 48 जागांचा आढावा घेणार आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघनिहाय उद्यापासून बैठकांचा धडाका सुरु होणार आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था असताना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपापल्या पक्षाच्या उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. (Political News )

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा 18 ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे. लोकसभानिहाय मतदारसंघाच्या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघ, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.(Latest Marathi News)

Uddhav Thackeray On BJP
Mahavikas Aghadi News : शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम, काँग्रेस-ठाकरे गटाची राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्याबाबत चर्चा?

मतदार संघाच्या बैठकांचा वेळापत्रक

16 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - नंदुरबार

  • दुपारी 1.30 वाजता- धुळे

  • दुपारी 4.30 वाजता - जळगाव

  • दुपारी 5.30 वाजता - रावेर

17 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - अहमदनगर

  • दुपारी 4.30 वाजता - नाशिक

  • दुपारी 5.30 वाजता - दिंडोरी

Uddhav Thackeray On BJP
Student Flag Hoisting News : शाळेत पोहोचणं अशक्य झालं, विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच केलं ध्वजारोहण; नेमकं काय झालं?

18 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - मावळ

  • दुपारी 1.30 वाजता- शिरुर

  • दुपारी 4.30 वाजता - बारामती

  • दुपारी 5.30 वाजता - पुणे

19 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - सातारा

  • दुपारी 1.30 वाजता- सांगली

  • दुपारी 4.30 वाजता - कोल्हापूर

  • दुपारी 5.30 वाजता - हातकणंगले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com