supriya sule saam tv
मुंबई/पुणे

फोन केला तेव्हा...'; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील भाषणाचा किस्सा

शरद पवारांच्या भाषणावरील एका प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील भाषणाचा किस्सा सांगितला.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Supriya Sule News : शरद पवारांचं पावसातील भाषण हे देशाच्या राजकारणातील यादगार भाषण आहे . या भाषणात शरद पवारांनी भाजपवर टीका केली होती. या सभेमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरण बदललं होतं. या सभेमुळे दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. या साताऱ्यातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले होते. याच शरद पवारांच्या भाषणावरील एका प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील भाषणाचा किस्सा सांगितला.

पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येत आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील मुलाखतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

शरद पवारांच्या पावसातील भाषणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शरद पवार पावसात भिजले, तेव्हा आम्हाला माहितच नव्हतं. फोन केला तेव्हा आम्ही शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होतो. त्यामुळे हे काही माहितच नव्हतं. पण साताऱ्याची सभा ही भारतीय राजकारणातील मोठी शिकवण आहे, असं संसदेत पण म्हणतात'.

'मी वडिलांना 'अनप्रिडिक्टेबल' म्हणाले, तेव्हा मी २१ वर्षांची होते. आता ५२ वर्षांची आहे. आता मी म्हणेन 'स्ट्राँग' हा एकच शब्द आहे, त्यांचं वर्णन करायला. तर पवार कधीच कालबाह्य नसतात, नाहीत. त्यांना सगळं माहित असतं. मी आणि दादा कंटाळतो, इतकं त्यांना माहित होतं. आम्हाला वाटलं कशाला यांना कोणी सांगितलं', असेही पुढे सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्घृण हत्या

IND vs SA W World Cup 2025 : नवी मुंबईत ऊन अन् पावसाचा 'खेळ'; विश्वचषकाचा अंतिम सामना रद्द झाल्यास कोण चॅम्पियन होणार?

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

SCROLL FOR NEXT